माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

आदिवासींची कैफियत

एवढा राबून भाता लावायची. त्यात कवा मवा पाणी पडायचा. त्याच्यातुनबी पिक जगला वाचला तर ह्या असा किडीन खाऊन टाकायचा. मग सांगा आम्ही कसा जगायचा ? हा सवाल आहे. अकोले तालुक्याची आदिवासी भागातील सावरकुटे येथील जनाबाई बांडे या महिलेचा. हताश हतबल झालेली जनाबाई हा सवाल विचारतेय त्याला पार्श्वभूमीही तशीच आहे. आदिवासींची जीवनरेखा असलेले भातपीक यंदा लहरी हवामान आणि किडीने फस्त केलेय......

एकाच वेळी शेतात भातलावणी केली खरी मात्र आज दिसतेय ते असे की खळभर जागेवरील पिक कापणीला आलेय.. खळेभर जागेवरचे पिक आताशी कुठे निसावतेय.. आणि बाकीचे तर आधीच किडीने गिळून टाकलेय.. आमदानी (पीकपाणी ) धड तर दिवाळीला गोडधोड अशी आदिवासींची पिढ्यान पिढ्यांची स्थिती. वर्षभराच्या बेगमिपुढेच भले मोठे प्रश्नचिन्ह उभे ठाकल्याने यंदाच पेटं कडेला कस जायचं या विवंचनेने आदिवासी धास्तावलेले दिसताहेत.

मुळा नदीचे उगमस्थान असलेल्या आजोबा पर्वताला सामावून घेणाऱ्या कात्राबाई, घनचक्कर, मुडा, शिंदोळ्या या बलाढ्य पर्वतरांगेच्या कुशीतल्या डांबरी सडकेवरून जाताना खाचरांमधली भातशेती दिसत होती. हळव्या भाताची कापणी झालेली तर गरव्या भाताचे पिक उभे आहे. मात्र या पिकात नेहमी सारखा दम दिसत नाही. त्यामुळेच धामनवानचा भरत बरामते हा तरून म्हणाला रोगामुळे रुपयातल चार आणच अवंदा हाताला लागलाय. उपनायला गेलं का वाऱ्याबराबर साळ बी उडून जाती. हे सांगताना भरतच्या चेहऱ्यावर उद्याच्या चिंतेची काजळी स्पष्टपणाने दिसते.

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )