माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

चला सह्यगिरी वाचवूया !

सह्याद्री पर्वताच्या कुशीतील पश्चिम घाट आजच्या घडीला जगातील सर्वाधिक नाजूक स्थितीतील पर्यावरणीय परिसरांपैकी एक बनलाय. मात्र त्याचे दररोज मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्तीकरण चाललेय. उपाय सोडा; अपायच जास्त. अजूनही ते सुरुच आहेत. सह्याद्रीच्या परिसरात विनाशकारी 'विकासा'ला दाखवलेले हिरवे कंदील हे प्रत्यक्षात पर्यावरणासाठी धोक्याचे लाल कंदीलच आहेत, हे आपण जाणतोच आहोत. सह्यगिरी वाचविण्यासाठी आता आणीबाणीच्या स्तरावर काम करणे गरजेचे आहे. केवळ भाषणे करून काही होणार नाही. तर प्रत्यक्ष कृती करण्याची ही वेळ आहे. आपण सगळे एकत्र येवून काहीतरी केले पाहिजे. अन्यथा निसर्गाचा हा अनमोल ठेवा 'इतिहासजमा' व्हायला वेळ लागणार नाही! मग चला तर सह्यगिरीला लागलेले 'ग्रहण' सोडवूयात. सह्यगिरी वाचवूया !

शिक्षक-विद्यार्थी आणि पर्यावरण चळवळीतील कार्यकर्त्यापर्यंत काही उपक्रम घेवून यायचे आम्ही ठरवलेय. पुणे येथील पर्यावरण शिक्षण केंद्राचे या कामासाठी सहकार्य लाभले आहे. त्यांनी बनविलेल्या साहित्याची या कामी मोठी मदत होणार आहे. त्यांनी बनविलेले साहित्य 'सह्यगिरी डॉट कॉम'च्या वाचकांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. हे उपक्रम शाळेत राबविल्यास मुले आपोआप पर्यावरणाविषयी सजग होतील, असा विश्वास वाटतो.

सह्यगिरीच्या बालवाचकांसाठी आणि शिक्षक मित्रांसाठी खास उपक्रम

पक्षी अभ्यास

फुलपाखरे उद्यान उपक्रम

व्यक्तिगत उपक्रम

पाण्याची गुणवत्ता तपासणे

उर्जा

गवत

आपल्या परिसरातील आंब्याच्या गावठी वाणाचा अभ्यास

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )