माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

पेमगिरी येथील विशाल वटवृक्ष

संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील भीमगड उर्फ शहागडाच्या दक्षिणेस दोन किलोमीटर अंतरावर मोरदरा नावाच्या भागात एक विशाल वटवृक्ष आहे. वादळ-वा-याला तोंड देत अनेक वर्षांपासून तो तेथे उभा आहे. सुमारे दीड ते दोन एकरवर हा महाकाय वृक्ष पसरलेला आहे. त्याच्या मुख्य खोडाचा घेर ५८ फूट आहे. त्याच्या एकूण पारंब्या ९० च्या जवळपास आहेत. झाडाचा उत्तर-दक्षिण व्यास ३०० फूटांपर्यंत तर पूर्व-पश्चिम व्यास २८० फूट इतका मोठा आहे.
या वडाच्या झाडाखाली भिल्ल-रामोशांची 'जाखाई-जाकमतबाबा' ही दैवते आहेत. या दैवतांची दंतकथाही फार मोठी रोमांचकारी आहे. गुरं-शेळ्यांची राखण करणा-या रामोशी समाजातील जाकमतबाबाची जंगली वाघाशी झुंज झाली. रक्तबंबाळ झाले. पण दोघेही हटले नाहीत. अगदी अखेरपर्यंत! या रोमांचक संघर्षात वाघ आणि जाकमतबाबा या दोघांनीही येथेच अखेरचा श्वास घेतला. आपल्या भावाची अशी अवस्था पाहिल्यावर बहीण जाखाईला दु:ख अनावर झाले. आणि भावाच्या कलेवरावर पडून आक्रोश करतच तिनेही प्राण सोडला. पुढे या जागेवर रामोशांनी त्यांच्या मूर्तीची स्थापना केली.

मूर्तीची स्थापना केल्यानंतर पुढे झाडाचेही दैवतीकरण झाले. कुणी जाणीवपूर्वक फांद्या तोडल्या, पाने तोडली तर जाकमतबाबा त्यांना चांगलाच धडा शिकवतो, यावर लोकांची दृढ श्रद्धा बसली. त्यामुळे झाडाचा कुणी विध्वंस करत नाही. परिणामी झाडाचे रुपांतर विशाल वटवृक्षात झाले. जेव्हा जेव्हा या वट वृक्षाला छाटण्याचा प्रयत्न झाला. त्या त्या वेळी त्या त्या लोकांना अद्दल घडली गेली, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. कारणं काहीही असोत, पण हा वट वृक्ष दिवसेंदिवस त्यामुळे विस्तारत गेला. आजमितीस हा महाराष्ट्रातला सर्वात विशाल वटवृक्ष आहे, हे नक्की. महाराष्ट्रातील हा महावृक्ष पाहण्यासाठी वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक, निसर्गप्रेमी या ठिकाणी आवर्जून येत असतात. कोलकात्याजवळील बोटॅनिकल गार्डनमध्ये आपल्या देशातील सर्वात विशाल वटवृक्ष आहे. देशभरात त्याखालोखाल येथील वटवृक्ष विस्ताराने मोठा असल्याचा दावा केला जातो.

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )