माझ्या विषयी...

नमस्कार...

अभिजात निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सामाजिक, राजकीय चळवळीचा गौरवशाली वारसा असलेल्या अकोले [अहमदनगर] तालुक्यातील बहिरवाडी या अगदी लहानशा खेड्यात शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. नोकरी धरल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. वाचन आणि लेखनाची आवड होतीच.त्या ओढीनेच पुढे मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमची पदवीदेखील संपादन केली. ललित, वैचारिक स्वरूपाचे विपूल प्रमाणात लेखन केले. एक कार्यकर्ता या नात्याने शिक्षण, पर्यावरण हे विशेष आवडीचे, जिव्हाळ्याचे आणि अभ्यासाचे विषय. त्यावरही थोडेफार लिखाण सुरु असते.

अगदी लहानपणापासूनच निसर्गात भटकंतीची आवड आहे. त्यातूनच मग छायाचित्रणाचा छंद जडला. वेळ मिळेल तेव्हा विशाल सह्याद्रीच्या कुशीत हिंडताना शेकडो प्रकारची छायाचित्रे काढली. निसर्गाचे निरनिराळे मूड्स [विभ्रम] कॅमे-यात पकडण्याचा प्रयत्न करीत गेलो. त्याची माहिती मिळवली.

भाऊसाहेब चासकर

(किंवा कीबोर्ड वरील Esc हे बटन दाबा अथवा मुख्य पानावर टिचकी मारा.)

सह्यगिरीवरील नवीन लेख:
लेखन

देखणे भूशिल्प रतनगड

सह्याद्रीतील एक बुलंद- बेलाग दुर्गरत्न, अशी ओळख रतनगडाची ओळख आहे. भंडारदरा धरणाच्या निसर्गरम्य परिसरात कळसुबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्य. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर. आणि समोर उत्तरेला खडा पहारा देणारे अलंग - मदन - कुलुंग हे कुर्रेबाज दुर्ग त्रिकुट, अशी भटकंतीची चीज करणारी ठिकाणे येथे आहेत. अशा रम्य ठिकाणच्या यादीत भर घालणारा आणि एक दुर्ग रत्न आहे रतनगड. समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार दोनशे फुट उंचीवर वसलेल्या या गडाने अनेक दुर्गयात्रींच्या मनाला मोहिनी घातली आहे.

काळाच्या ओघात किल्ल्याचे महत्व जसे कमी होत गेले तसा हा ऐतिहासिक ठेवा टिकविण्याचे आव्हान समोर उभे ठाकले आहे. इतिहासाच्या कागदपत्रांचा धांडोळा घेतल्यास फार मोठा इतिहास या गडाला असल्याचे कोठे सापडत नाही. पण गडाचे तालेवार सोबती पाहता, तेथील भग्नावशेष पाहता या गडाचा उपयोग शिवकालात आणि त्यानंतर नक्की झाला असेल, याची खात्री पटते.

थोडा वेळ इतिहास बाजूला ठेवला तरी रतनगडाच्या परिसराला फार मोठे महत्व आहे. जैवविविधतेच्या बाबतीतही हा परिसर देशातल्या आदर्श ठिकाणांपैकी एक आहे. रतनगडाच्या वाटेवर पूर्णपणे वृक्षराजीचे आच्छादन आहे. सायंकाळच्या वेळेस येथील गडामागे होणारा सूर्यास्त अविस्मरणीय असाच असतो. रतनगडाच्या डोंगराला एक आरपार छिद्र आहे. त्याला स्थानिक लोक नेढ म्हणतात. गडावर पाण्याचे असंख्य टाके आणि प्राचीन बांधकामाचे अवशेष आहेत. पठारावरून चहुबाजूचा लांबवरचा मुलुख नजरेच्या टप्प्यात येतो. दक्षिणेला लागून असलेली आजोबाची रांग,दरम्यानच्या खोल खोल द-या उरात धडकी भरवितात, वायव्येचा उंच सुळकाही (त्याला खुट्टा असे म्हणतात.) लक्ष वेधून घेतो.

समोर उत्तरेला कळसुबाईची बलाढ्य रांग दिसते. भंडारदरा धरणाच्या जलाशयाचे विहंगम दृश्य जसे दिसते, तसे अस्ताव्यस्त पसरलेले डोंगराचे फाटे, उतुंग कडे हे सारे पाहून आपण निःशब्द होऊन जातो. गडावर रत्नाबाईच्या गुहेत भंडारदरा जलाशय निर्माण करणा-या प्रवरा नदीचे उगमस्थान आहे. ४२०० फुट उंचीच्या रतनगडावरील सौंदर्य डोळ्यात साठविण्यासाठी दुर्गयात्रींची सतत ये- जा सुरु असते.

blog comments powered by Disqus

नातं निसर्गाशी...

देवराया म्हणजे जैववैविध्याच्या बाबतीत आपला वर्षानुवर्षांचा बँक बॅलन्स आहे. त्याच्या व्याजावर आपण जगत होतो. आता मात्र आपण मुद्दलालाच हात घालू पाहतोय... पुढे वाचा >>

प्रतिसाद...

फेस बुक वर सर्फिंग करतांना सहज प्रवीण अस्वले चे पोस्ट बघितले, जरा कुतूहल वाटले म्हणून लिंक बघितली. हि वेब साईट बघितल्यावर असे वाटले कि हे वेब साईट बघितली नसती, तर एका चांगल्या गोष्टीला मी मुकलो असतो. अतिशय अप्रतिम वेब साईट आहे. फोटोग्राफी, माहिती, कलेक्शन अप्रतिम आहे. नाशिकच्या जवळपास भरपूर किल्ले, मंदिरे तसेच. निसर्गरम्य ठिकाणे आहे हे माहित होता; परंतू त्याची भौगोलिक माहिती फोटोग्राफ सह उपलब्ध नव्हती. फक्त १ सूचना वजा विनंती आहे : ज्या स्थळांविषयी आपण माहिती दिली आहे तेथे कसे जायचे, कधी जायचे नि काय काळजी घ्यावी, हे जर वेब साईट वर टाकले तर अजून. छान होईल. आपल्या प्रयत्नास अनेक शुभेच्छा. धन्यवाद.
गौरव मदाने. नाशिक.

© भाऊसाहेब चासकर (२०१०-१२) प्रायव्हसी पॉलिसी

वेबसाइट डिझाईन: मीडिया इन्फोटेक, अकोले (७३८७ ११ २३ २३ )